द्राक्ष पिकामध्ये डाऊनी मिल्ड्यू हा एक बुरशीजन्य रोग आहे. यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होते. या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पावसाळ्यात अधिक प्रमाणात असतो, आणि योग्य वेळी नियंत्रण न ठेवल्यास उत्पादनात घट येऊ शकते. म्हणूनच, या रोगाची लक्षणे ओळखणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
डाऊनी मिल्ड्यूची (Downy Mildew) ओळख:
डाऊनी मिल्ड्यू हा एक बुरशीजन्य रोग आहे जो प्रामुख्याने Plasmopara viticola या बुरशीमुळे होतो. हा रोग पिकाच्या पोंगा अवस्थेत अधिक प्रभावी होतो, आणि विशेषतः एप्रिल छाटणीच्या शेवटी व ऑक्टोबर छाटणीच्या सुरुवातीला अधिक प्रमाणात दिसतो.
डाऊनी मिल्ड्यू होण्यास कारणीभूत घटक:
१) आर्द्रता आणि तापमान: १८ ते २५ अंश सेल्सिअस तापमान व वातावरणातील आद्रता डाऊनी मिल्ड्यूसाठी अत्यंत पोषक असते.
२) पावसाळी वातावरण: पावसाळ्यामुळे पानांवर पाण्याचा थेंब साचतो, ज्यामुळे बुरशीच्या वाढीस अनुकूल वातावरण तयार होते.
३) तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव: तुडतुडे किडीच्या प्रादुर्भावामुळे किंवा पाण्याचा ताण पानांवर येतो, ज्यामुळे बुरशीला पोषक वातावरण मिळते.
डाऊनी मिल्ड्यूची लक्षणे:
१) पानांवर ठिपके: पानांच्या वरच्या बाजूने पिवळसर, तेलकट ५ ते ६ मिमी आकाराचे ठिपके दिसतात, जे हळूहळू मिसळतात आणि पान वाळते.
२) पांढरी वाढ: पानांच्या खालच्या बाजूस पांढरी वाढ दिसून येते, आणि अशा प्रकारची वाढ फळांवर आणि फांद्यांवर देखील दिसून येते.
३) जलद प्रगती: या रोगाचे लक्षणे ३-५ दिवसांत दिसू लागतात, ज्यामुळे लगेच उपाययोजना करणे गरजेचे असते.
डाऊनी मिल्ड्यूसाठी प्रतिबंधात्मक उपाय:
१) छाटणी आणि स्वच्छता: जास्त पावसाळी वातावरणात छाटणी करू नये आणि छाटणी केलेल्या फांद्या, पाने इत्यादी जाळून नष्ट करावीत.
२) पानांचा कोरडेपणा: पानांवर पाणी साचणार नाही यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करा.
३) औषध फवारणी: Alcure या आंतरप्रवाही औषधाचा वापर करावा.
रोग येण्यापूर्वी: १ लिटर पाण्यामध्ये २ मिली Alcure मिसळून फवारणी करावी.
रोग झाल्यास: १ लिटर पाण्यामध्ये ४ मिली Alcure मिसळून फवारणी करावी.
निष्कर्ष : डाऊनी मिल्ड्यू हा द्राक्षबागेतील गंभीर रोग आहे. त्याचे लक्षणे आणि कारणे ओळखून योग्य काळजी घेतल्यास या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो.